धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे, एका कंत्राटी कर्मचाऱ्याने रुग्णासोबत आलेल्या महिलेवर एका रूममध्ये नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण सासूने आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी त्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 10 नंतर हा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी त्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीमार्फत साफसफाई आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयात कामावर हजर असलेल्या गौरव विष्णू डोंगरे (रा. वैराग रोड धाराशिव) याने हा घृणास्पद प्रताप केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी गौरव विष्णू डोंगरे विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये भादवि 354, 354 (अ) 1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सीआर नंबर 144/24 ) मिळालेल्या माहितीनुसार , धाराशिव तालुक्यातील एका खेडेगावातील एक महिला आपल्या आजारी मुलाला घेऊन, शुक्रवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. सोबत मदतीसाठी तिची सासू देखील आली होती.  तिच्या सासूने आरडोओरड केला, त्यामुळे रुग्णालयात गोंधळ सुरु झाला, त्यामुळे अनेक लोक जमले. लोकांची गर्दी पाहून याने रुग्णालयातून धूम ठोकली. सीसीटीव्ही फुटेजवरून सदर कंत्राटी कर्मचाऱ्याची ओळख पटली आहे. या प्रकरणी सदर कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्यास तात्काळ कामावरून कमी केल्याचे सांगितले.


 
Top