धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ विभागातील उपप्राचार्य श्री बबन सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव कार्यकर्ते व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top