उमरगा (प्रतिनिधी)- विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त रविवारी (दि.14) सकाळ पासून पालिके समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष,संघटना आणि आंबेडकर प्रेमींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे तर,जयंती समितीचे अध्यक्ष श्रीधर सरपे यांच्या हस्ते निळ्या झेंड्याचे वंदन करण्यात आले,बौधाचार्य मिलिंद डोईबळे, धम्मचारी विबोध,धम्ममित्र शाक्यदीप कांबळे,जी.एल.कांबळे, फुलचंद कांबळे यांनी बुद्ध पूजा घेतली. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

आमदार ज्ञानराज चौगुले,युवा नेते किरण गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीप भालेराव,नो चँलेज ग्रुपचे अध्यक्ष विजय वाघमारे,माजी नगरसेवक विक्रम मस्के, सतिश सुरवसे,बाबा मस्के, युवा नेते किरण गायकवाड,शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे,शरद पवार,सचिन जाधव,संदीप चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे,हरीष डावरे,माजी नगरसेविका ललिता सरपे,संगीता पाटील,संगीता कडगंचें,सुवर्णा भालेराव, राहुल सरपे,विक्रम मस्के,सहदेव सोनकांबळे,जीवन सरपे,पालिकेचे कार्यालयिन अधीक्षक तुळशीदास वऱ्हाडे,अजय सरपे,कमलाकर सूर्यवंशी,अभिमन्यू भोसले,सुशिल दळगडे,दत्ता रोंगे,मुस्लिम कमिटीचे बाबा औटी, याकूब लदाप, शिवसेना उबठा गटाचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, मराठा सेवा संघाचे अनिल सगर, बाळासाहेब मोरे, शांतकुमार मोरे,भूमिपुत्र वाघ,डी.टी. कांबळे, एम.एस.सरपे,प्रा.किरण सगर,दिगंबर भालेराव,धीरज बेळंबकर, बाबा मस्के,विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड.जी.के.गायकवाड,अँड व्ही.एस. आळंगे,अँड.मल्हारी बनसोडे,अँड. हिराजी पांढरे,विक्रांत सूर्यवंशी,गुणवंत गायकवाड,उमाजी गायकवाड,सुभाष काळे,अडँ एस.पी.इनामदार,आदींनी डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन केले. 


शहरातील नो चॅलेंज ग्रूप, सारनाथ बौध्द विहार, पंचशील तथागत वाचनालय, समता नगर, दि लॉर्ड बुध्दा चॅरिटेबल ट्रस्ट, एकतानगर, काँग्रेस भवन, भिमराष्ट्र ग्रूप, बसस्थानक, ॲटो यूनियन, प्रभात मॉर्निंग ग्रूप, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, काळे प्लॉट, शासकीय-निमशासकीय कार्यालय, शहरातील महाविद्यालय, खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळेत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रामीण भागात शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.


भारतीय बौध्द महासभेच्यावतीने डॉ बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत शंभराहून अधिक विद्यार्थी सहभागी झालेले होते. रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी विजेत्यांना रोख रक्कम, पुस्तक, पेन व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले. यासाठी महासभा शाखेचे तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे,शहराध्यक्ष प्रा संजीव कांबळे तालुका सरचिटणीस किरण कांबळे, शहर सरचिटणीस अविनाश भालेराव आदींनी पुढाकार घेतला.


भीम गीताच्या माध्यमातून अभिवादन

वंदना कला पथक,गीत गुंजन कलापथक लातूर यांच्या दिवसभर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अशोक कलापथक कलदेव निंबाळा, गुणरत्न कलापथक उमरगा आदी गायन कलपथका च्या वतीने भीम गीते सादर करून अभिवादन करण्यात आले.


 
Top