उमरगा (प्रतिनिधी)- कलबुर्गी-लातूर मार्गावरील श्री क्षेत्र बिरूदेव मंदीर संस्थानात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीबिरूदेव चरित्र वाचन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार (12) पासून गुरूवार (18) पर्यंत या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री क्षेत्र बिरूदेव मंदीर संस्थानात प्रतिवर्षा प्रमाणे यंदाच्या वर्षीहि सप्ताहाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सप्ताह सोहळ्यात दररोज दुपारी चार वाजता श्री बिरूदेव चरित्र वाचन होणार असून शुक्रवारी (12) हभप सदानंद लखणे यांची कीर्तनसेवा होईल. शनिवारी (13) बालकीर्तनकार हभप सार्थक गायकवाड महाराज, रविवारी (14) बालकीर्तनकार सोनाली सागडे जालना, सोमवारी (15) हभप महेश महाराज माकणी,मंगळवारी (16) हभप आशिष महाराज काटे शिखर शिंगणापूर यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी (दि 17) श्री रामनवमी निमित्त सकाळी दहावाजता हभप ज्ञानेश्वर महाराज माकणी तर रात्री हभप हरि लवटे अचलबेट यांचे तर गुरूवारी (18) हभप ज्ञानेश्वर महाराज श्री नाथ मंदिर यांचे काल्याचे कीर्तन होईल. दररोज चार वाजता श्री बिरूदेव चरित्र वाचन होणार आहे. या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री क्षेत्र बिरूदेव मंदिरे संस्थानच्यावतीने आवाहन केले आहे.


 
Top