धाराशिव (प्रतिनिधी)-सन 1989 पासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असून या समाजास आजपर्यंत कायमस्वरूपी केला असे आरक्षण भेटलेले नाही. यासंदर्भामध्ये आपण लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये मराठा समाजास कायमस्वरूपी आरक्षण मिळणे बाबत कायम आग्रही भूमिका घेतली असून या अनुषंगाने लोकसभेमध्ये तारांकीत प्रश्न मांडून शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वळवण्याचा व मराठा आरक्षणाचा मुद्दा च्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप सरकारच्या काळामध्ये मराठा समाजास दिलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवण्यासाठी व भाजप सरकारने त्या अनुषंगाने काय प्रयत्न केले हे संपुर्ण महाराष्ट्रास माहित आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे आपण वारंवार प्रयत्न केले आहे तसेच मुस्लिम समाज व लिंगायत समाजास अल्पसंख्याकांचा दर्जा देणेबाबत आपण सातत्याने आग्रही भूमिका मांडली आहे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले असल्याचे ईटकुर येथील सभेमध्ये बोलत असताना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रतिपादन केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार सातत्याने मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण काय केले असे प्रश्न विचारत आहेत. आंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे समाज बांधवावर पोलिसांकडून लाटी हल्ला करण्यात आला.

यानंतर आपण व आ. कैलास पाटील यांच्यासह मनोज दादा जरांगे यांची भेट घेतली होती. मराठा समाजाच्या गाड्या अंतरवाली सराटी व मुंबईकडे मोर्चासाठी जात असताना गाड्यांसाठी टोल माफी करून दिलेली होती. विरोधाकांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांनी मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेऊनही तेच मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी खासदारांनी काय केले असा प्रतीप्रश्न विचारत आहे, जे की देवेंद्र फडणवीस यांची मर्जी राखण्यासाठी पुढे पुढे करत आहे.

मराठा समाजाच्या विरोधाची भूमिका कायमस्वरूपी घेतली फेसबुक, व सोशल मिडीयावरील त्यांचे भूमिका सर्व महाराष्ट्राने पाहिले असून यासंदर्भात मराठा समाज त्यांना कदापही माफ करणार नाही. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलणे म्हणजेच मोठा विरोधाभास आहे. आपण स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय दिवे लावलेले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातील मतदार जाणतो आहे. याचे उत्तर येणाऱ्या 7 मे 2024 रोजीच्या मतदान दिवशी मतदार बांधव मतदानातून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. असे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ईटकुर तालुका कळंब येथील सभेमध्ये बोलताना केले.

याप्रसंगी  तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, दिलीप पाटील, बळवंत तांबारे,संजय कांबळे, विठ्ठल माने सर, लक्ष्मण अडसुळ, उपजिल्हप्रमुख प्रदिप मोटे, प्रताप पाटील, मुसद्दीन काझी, मालोजी पाटील,बाळासाहेब गंभीरे, आश्रुबा बिकडे, संजय होके, मुस्ताक खुरेशी, रामचंद्र चोरघडे, अनिल आप्पा आडसुळ, आशोक अडसुळ, बालाजी कोल्हे, पवन अडसुळ, पांडुरंग नलावडे गुणवंत कोठावळे, पंडीत देशमुख, विश्वजीत नरसिंग जाधव, अरुण आप्पा वेदपाठक, महादेव चोरघडे,बिबिहान देशमुख गंगाधर नाना खराटे, बंडु यादव,राजे साहेबांचे सहकारी आबा वावळे, भारत नाना सांगळे, हरीभाऊ कुंभार, गोविंद चौधरी, अतुल कवडे उपस्थित होते.


 
Top