उमरगा (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत महादेव   मंदिराच्या यात्रा महोत्सवानिमित्त शनिवारी ( दि.20) सांयकाळी “श्री“ च्या काठीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मिरवणूकीत सादरीकरण केलेल्या धार्मिक व पौराणिक सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते.

ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे वास्तव्य असलेल्या हेमाडपंथी ग्रामदैवत महादेव   मंदिराच्या यात्रेनिमित्त देवस्थान पंचकमेटीच्या सलग पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सांयकाळी  महादेव देवस्थान पंच समितीचे बाबुराव सुरवसे, राम पौळ, व्यंकट शिंदे, बळीराम कोराळे,  राजू दामशेट्टी, चंद्रकांत मजगे,  भरत भोसले, दिलीप इंगळे, प्रकाश इंगळे, किशोर शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते श्रीच्या काठीची विधीवत पुजा आणि आरती करण्यात आली. मिरवणूकीत अनेक उत्साही तरूणांनी हलगीच्या तालावर मोठ्या कौशल्याने काठी उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बँजोच्या तालावरही तरुणांनी जल्लोष साजरा करत मिरवणूकीत रंगत वाढविली. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या सोंगाच्या गाड्यांनी (सजीव देखावे) सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रोहिम मुरमे, जान्हवी मुरमे यांनी सादर केलेल्या महादेव पार्वतीच्या देखाव्यास प्रथम, द्वितीय क्रमांक राम - सिता (रुद्र नरसाळे, प्रांजल जाधव) व श्री राधाकृष्ण (माऊली शिंदे, आरोही नरसाळे) यांना विभागुन देण्यात आले. तृतीय क्रमांक श्री.छत्रपती शिवाजी महाराज (विशाल कलशेट्टी) व संत तुकाराम (युवराज शिंदे व मनस्वी मुरमे) यांच्या देखाव्यास विभागातुन देण्यात आला. ज्ञानेश्वर सोनटक्के यांच्या जय मल्हार व दुर्गा बिराजदार यांनी सादर केलेल्या जिजाऊ यांच्या देखाव्यास उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. तर दिनेश शिंदे व महादेवी साऊंड सर्विस यांनी सादर केलेल्या श्री. महादेवाची पिंड या सुंदर देखाव्यास विशेष बक्षिस देण्यात आले. राजेंद्र सुर्यवंशी, विनोद कोराळे, नितीन सुर्यवंशी, किशोर शिंदे, दत्तात्रेय शिंदे, राम माळी, अमोल मिरकले, कैलास शिंदे, राजेंद्र सुर्यवंशी, नरेंद्र इंगळे, दिनेश शिंदे, तानाजी शिंदे, सोनू कोराळे, मेघराज आरळे, सुरज पाटील, गोविंद सुरवसे, अभंग शिंदे आदींनी यासाठी पुढाकार घेतला. पत्रकार अविनाश काळे, मुख्याध्यापक प्रविण स्वामी यांनी देखाव्याचे परिक्षण केले.  


 
Top