कळंब (प्रतिनिधी)- शहरातील महसूल कॉलनीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने महसूल कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. 3 एप्रिल पासून सुरू झाले असून सप्ताहाची सांगता दि. 10 एप्रिल रोजी होत असून, स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त 10 एप्रिल रोजी सकाळी 10  वाजता हभप. दत्ता महाराज आंबिरकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता गुलालाची उधळण होणार आहे. तरी परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तांनी दि. 10 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.  


 
Top