तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदिरातील  शिखरावर मंगळवार दि.9 एप्रिल रोजी  गुढीपाडव्या निमित्ताने  पहाटे मंदिरावर गुढी उभारण्यात आली होती. गुढी उभारण्यात आल्यानंतर यावेळी देविचे महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, प्रशाकिय व्यवस्थापक सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांनी गुढीचे पुजन करुन आरती केली. यावेळी गणेश नाईकवाडी, रविचंद्र  गायकवाड यांची उपस्थितीत होते. गुढीपाडवा निमित्ताने मंदीर गर्भगृह आकर्षक फुलांनी सजवले होते. गुढीपाडवा दिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती.


 
Top