धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद धाराशिव आरोग्य विभागातील सुपरवायझर तानाजी विश्वनाथ क्षीरसागर यांच्या मातोश्री लक्ष्मी विश्वनाथ क्षीरसागर यांचे वयाच्या 80 वर्षी तुळजापूर येथे राहत्या घरी सोमवार दि. 1 एप्रिल 2024 रोजी सकाळी दुःख निधन झाले. 

कै. लक्ष्मी क्षीरसागर या मुळच्या बारूळ येथील असून, त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. पतीच्या निधनानंतर एक मुलगी, एक मुलगा यांना उत्तमरित्या कै. लक्ष्मीबाई यांनी संभाळले. कै. लक्ष्मीबाई या जनार्धन व दिंगबर हुंडेकर यांच्या बहिण होत्या. त्यांच्यावर घाटशीळ रोड भागातील स्मशानभूमी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top