उमरगा (प्रतिनिधी)- आजच्या विद्यार्थ्यांनी सतत स्वप्न बघावे आणि त्या दिशेने वाटचाल करावी. हे करत असताना इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि मार्गक्रमण करत असताना वास्तव स्वीकारले पाहिजे. नेहमी आशावादी राहिली पाहिजे. या सूत्रानुसार आपण शिक्षण घेत राहिलो तर मला खात्री आहे की तो विद्यार्थी कोठेही अपयशी ठरत नाही. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे प्रतिपादन डॉ. कपिल महाजन यांनी केले.

दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी श्री राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्या कार्यक्रमात डॉ. महाजन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक राजा दे. शेट्टी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक वीरंची पाटील, श्रीराम कुलकर्णी,संजय धोंडदेव, प्रवीण अनुदुरकर, प्रकाश शास्त्री, लता कुलकर्णी आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.महाजन म्हणाले की विद्यार्थ्यांनी नेहमी गुरुबद्दल आदर राखला पाहिजे. विचार हाच वृक्ष आहे आणि थोरांची प्रेरणा आपण घेऊनच प्रगती करावी. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी पाणी वाया घालू नये. पाण्याचा वापर काटकसरीने करावा याबद्दल सचित्र मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात राजाध्यक्ष टी यांनी पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा तुळजापुरे यांनी केले. तर प्रास्ताविक बेबी सरोजा पवार यांनी केले. आभार तुकाराम राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला इयत्ता सातवीचे 257 विद्यार्थी व सर्व शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.


 
Top