तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस 3 मे पासून प्रारंभ होत आहे.

3 मे रोजी राज्यातील विविध भागातून दिंडयाचे तेर येथे आगमन व सायंकाळी हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे किर्तन. तर 4 मे रोजी सकाळी श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा व सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन. 5 मे रोजी सायंकाळी हभप शंभर महाराज थोबडे यांचे किर्तन, 6 मे रोजी सकाळी हभप दत्तात्रय महाराज अंबीरकर यांचें किर्तन त्यानंतर श्री संत गोरोबा काका  पुण्यतिथीनिमित्त समाधी उत्सव (गुलाब पुष्प उधळण सोहळा ) कार्यक्रम होईल. सायंकाळी हभप कान्होबा महाराज देहूकर यांचे किर्तन. तर 7 मे रोजी  श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे सकाळी 10 ते 12 काल्याचे हजेरी किर्तन व गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे. याचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक रूपाली कोरे -बारवडे व व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे


 
Top