धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्यास भीम अनुयायांसह सर्व समाज घटकांतील नागरिकांनी अभिवादन करून मानवंदना दिली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओम राजेनिंबाळकर, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष, पोलि अधीक्षक अतुल कुलकर्णी आदींनी अभिवादन केले. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनेच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.

क्रातिसूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा मूकनायक, बोधिसत्व तू, अशा भीमगीतांच्या निनादात धाराशिवमध्ये 16 मंडळांनी मिरवणुका काढल्या. मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील अनेक गावामधून नागरिक उपस्थित होते. तसेच फुले, शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितींच्यावतीने सुमारे तीन हजार अनुयांना सकाळपासून रात्रीपर्यंत भोजनदान करण्यात आले. 

शहरातील भीमनगर परिसरातून सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. एकामागून एक डॉल्बी व विशेष सजावट करण्यात आलेल्या रथ नेण्यात येत होते. रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीला सुरूवातीपासून उत्साह होता. विविध गावातून आलेले युवक, युवती, पौढ, जेष्ठ नागरिक, बालक असे सर्वजण मिरवणुकीत सहभागी झाले होते. 


 
Top