तुळजापूर (प्रतिनिधी)-  महायुतीमध्ये शेवटच्या टप्यात मोठ्या वेगाने घडामोडी घडल्याने मनी ना ध्यानी नसताना अचानकपणे राजकिय समीकरणे बदलल्याने अखेर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी  मिळाली. यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण  झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाने शिवसेनेला 22 हजार 282 चे मताधिक्य दिले होते. तर विधानसभा निवडणुकीत भाजपला कौल दिला.

तर महाविकास आघाडी मध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना 110315 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 88033 तर अर्जुन सलगर यांना 20412 मते मिळाली. तालुक्यातुन खासदार निंबाळकर यांना 22282 चे मताधिक्य मिळाले होते. ते आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधूमाळी भाजपचा बालेकिल्ला झालेल्या तालुक्यात जोरात सुरु झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या स्वतःच्या तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या तालुक्यातून मताधिक्य जादा देण्याचे आव्हान त्यांच्यावर आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीने प्रचाराची पहिली फेरी पुर्ण केली आहे. महाविकास आघाडीची तालुक्यात असलेली ताकद लक्षात घेण्याबरोबरच भाजप विरोधात इथे असलेले विरोधातील वातावरण या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील तुळजापूर तालुक्यावर बारीक लक्ष ठेऊन फिल्डींग लावली आहे.  काँग्रेसचे माजीमंञी मधुकर चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेस नेते विधानसभेचे दावेदार मधुकर चव्हाण प्रकृती अस्वस्थतामुळे राजकारणात कमी प्रमाणात सक्रिय राहिल्याने तालुक्यात विरोधी पक्षाची ताकद कमी झाले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती जि. प. माजी उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील यांना तालुक्याच्या विधानसभेच्या या मतदारसंघाकडून मोठे मताधिक्य मिळण्याच्या अपेक्षा आहेत.


 
Top