धाराशिव (प्रतिनिधी)- फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांची 197 वी व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत दि.11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील निवडक क्षणातील चित्र प्रदर्शन व आकर्षक अशा बुध्द गुफा देखाव्याचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष साहेब, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या हस्ते व उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे.

या जगात युध्दाची नव्हे तर बुध्द विचाराची गरज आहे. फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्यावतीने आकर्षक अशा बुद्ध गुफा देखाव्याचा छोटासा प्रयत्न करुन महामानवाला मानवंदना देण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. दि.11 एप्रिल ते दि.14 एप्रिल पर्यंत हा बुद्ध गुफा आपल्या सर्वांना पाहण्यासाठी मोकळा ठेवण्यात आला आहे. तरी शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही या बुध्द गुफास भेट द्यावी असे आवाहन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्यावतीने गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे. फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे पदाधिकारी अंकुश उबाळे, बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे, संपतराव शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, संजय गजधने, प्रविण जगताप, बलभीम कांबळे, संग्राम बनसोडे, रमेश कांबळे, दिपक पांढरे, स्वराज जानराव, विशाल घरबुडवे, रुधिर गायकवाड,गणेश रानबा वाघमारे, शशी माने, विशाल सरवदे, विनोद माने, शिवलिंग लोंढे, अतुल चव्हाण, प्रदिप गायकवाड अन्य इतरांनी या जागेत श्रमदान केले आहे.


 
Top