तुळजापूर (प्रतिनिधी) - दरवर्षीप्रमाणे याही वर्षे रमजान व महंत तुकोजीबुवा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय सर गंगणे मिञमंडळाच्या वतीने  बुधवार दि.10 एप्रिल रोजी शहरातील मुस्लीम बांधवांना रमझान साजरा करण्यासाठी साहित्य किट वाटप करण्यात आले.

युवा नेते  विनोद गंगणे, आनंद कंदले, नरेश अमृतराव यांच्या हस्ते मनोज गवळी. ओनिल हंगरगेकर, सुशांत हत्तीकर, इम्रान शेख, हजु शेख, सोहील शेख, अमीर तांबोळी, जावेद शेख यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. या उपक्रम यशस्वीते साठी सभापती विजयसर गंगणे मिञमंडळ व पापनाश व विवेकानंद नगर मधील सदस्यांनी परिश्रम घेतले. रमझान सण साजरा करण्यासाठी साहित्य सह  पाच लिटर दूध 76 कुंटुबियांना देण्यात आले.


 
Top