तुळजापूर (प्रतिनिधी) -  लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तुळजापूर तालुक्यात राजकिय भुकंप घडविण्यासाठी हालचाली होत आहेत. येत्या काही दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तुळजापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधीपक्ष  नियोजनबध्द पध्दतीने निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्यात यश सताधारींना  बऱ्यापैकी  यश ही आले.

आता माञ तुळजापूर तालुक्यात राजकिय भुकंप करण्याची गरज तालुक्यात सताधाऱ्यांना आवश्यक असल्याने सताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुक तोंडावर राजकिय भुकंप घडविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. भाजपचे नेते तथा उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडुन  शब्द घेतल्यानंतर भुकंप होण्याची शक्यता आहे. तोपर्यत वेट अँण्ड वाँचची भूमिका संबंधित नेत्याने घेतल्याचे वृत्त आहे.

तुळजापूर तालुक्यात भाजपकडुन केला जाणारा भुकंप हा मोठ्या स्केलचा असणार आहे. यामुळे विधानसभेपुर्वीच लोक सभेच्या रणधुमाळीतच विरोधकांची ताकद क्षीण करण्याचे प्रयत्न भाजप केला जात आहे. याला यश येण्याची शक्यता वाटत आहे. सदरील राजकिय भुकंप झाला तर याचा लाभ कि तोटा होणार हेहि लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. या राजकिय भुकंपाचे छोटे -छोटे धक्के सध्या बसत आहे. माञ मोठा धक्का बसल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील राजकिय पातळीवरील चिञ स्पष्ट होवुन प्रचार रणधुमाळी वाढणार हे निश्चित आहे. विरोधी पक्षही कधी नव्हे ऐवढा राजकीय भुकंपाची वाट बघत आहे. म्हणजे राजकिय चिञ स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला आपल्या विचाराचा नेत्यासाठी प्रयत्न करण्यास रान मोकळे राहणार आहे.


 
Top