तुळजापूर (प्रतिनिधी) - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी  महाविकास आघाडीने  विधमान खासदार ओमराजे  निंबाळकरांची उमेदवारी जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीत मात्र उमेदवाराच्या नावावरून चर्चेचे गुन्हाळच सुरू आहे. महायुतीचा उमेदवारच ठरत नसल्याने प्रचार करायचा तरी कोणाचा, असा प्रश्नच महायुतीतील घटक पक्षांना पडला आहे.लोकसभागृहाची मुदत संपल्यानंतर भाजपचा या  मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असतील, असा कयास बांधला जात होता;

परंतु भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये चर्चतील उमेदवार बाबतीत निगेटीव्ह रिपोर्ट मिळाले. त्यामुळे केंद्रात राज्यात सत्ता असुन ही भाजप ला उमेदवार जाहीर करता आला नाही. त्यातच या जागेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने हक्क सांगितल्याने मतदारांमध्ये उमेदवारा बाबतीत संभ्रवस्था निर्माण झाली. सध्या भाजपकडुन आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी, बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील असे नावे चर्चत होते. तर  शिवसेनेकडुन पालकमंञी तानाजी सावंत त्यांचे पुतणे धनंजय सावंत, माजी खासदार रवि गायकवाड तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या जागेवर हक्क सांगितल्याने रा काँचे जेष्ट नेते सुरेश बिराजदार यांचे नावे सर्वाधीक चर्चत होते.

माञ मागील काही दिवसा पासुन भाजप कडुन सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे नाव अचानक चर्चत आले आहे. त्यांना येथुन उमेदवारी देण्यासाठी  कर्नाटक येथुन परत मुंबईत बोलवल्याचे समजते. तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जाणार असुन येथुन जि. माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचे नाव चर्चत अचानक शेवटच्या टप्यात आले आहे. त्यामुळे महायुती पक्ष व उमेदवार बाबतीत घटक पक्षाचे मंडळी संभ्रमावेस्थेत सापडला. प्रचार करायाचा कुणाचा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

आठ-दहा दिवसांपासून आज होईल, उद्या होईल, असे म्हणत कार्यकर्ते मित्रपक्षातील सहकाऱ्यांना उभारी प्रचार करायचा तरी कोणाचा : घटक पक्षांना पडलाय प्रश्न गेली पाच वर्षे प्रचंड गोंधळाची आणि राजकीय उलथापालथीची गेली. 105 आमदार निवडून आले असूनही विरोधात बसावे लागल्याने भाजप उमेदवारी प्रचंड दक्षता घेत असल्याचे दिसुन येते. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये उभी फूट पाडून आपला पक्ष एकसंघ ठेवण्यात राज्य पातळीवरचे नेतृत्व यशस्वी ठरले. भाजपने आखलेल्या रणनीतीचा परिणाम धाराशिव येथेही दिसला.  शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपजवळ गेले. महाविकास आघाडीने जिल्हयाच्या अस्मिता  भावनेलाच स्पर्श केला आहे. जनतेत राहणारा अशी ओळख असणारा शिवसेना उबाठा गटाचे विधमान खासदार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली. महायुतीकडून अनेक नावांची चर्चा करण्यात आली. पण नाव काही निश्चित झाले नाही. भरीस भर म्हणून भाजपने अंतर्गत केलेल्या सर्व्हेमध्ये चर्चतील नावे भाजप ला हमखास यश मिळवू देणारे ठरणारे नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत असल्याचे समजते त्यामुळेच इथून उमेदवार देताना महायुतीकडून वेळ लावला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एक -दोन दिवसात उमेदवार निश्चीत होवुन जाहीर होण्याची शक्यता आहे.


 
Top