धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरात धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने सौ.रेखा कपिल नवगिरे (साखरे) यांना तुळजापूर तालुका पंचायत समिती तर्फे दिला जाणारा सन 2022-23 सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा वागदरी येथे विद्यार्थीवर प्रेम करून तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक परिक्षेत उत्तुंग यशाप्रयंत पोहोचविण्याचे काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्यावतीने शाल व संताजी जगनाडे महाराज यांचा फोटो देऊन करण्यात आला.

तसेच सागर दादासाहेब घोडके याने आलं इंडीया सैनिक स्कूल परिक्षेमध्ये संपुर्ण देशात 1224 रॅकने 81 टक्के मिळवत सातारा सैनिक स्कूल येथे शिक्षणासाठी पात्र झाल्या बद्दल धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने शाल संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हा सचिव अँड विशाल साखरे,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले, लोहारा तालुका अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कपिल नवगिरे,धाराशिव तालुकाअध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, दादासाहेब घोडके,अमर कोरे,विमल कोरे,राणी कोरे, जान्हवी कोरे,अणुराधा घोडके यांच्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top