धाराशिव (प्रतिनिधी)- खेड येथील लालबहादूर शास्त्री विद्यानिकेतन खेड येथे दि.16/03/2024 रोजी यशवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.खेड येथील अविनाश टिकले शिक्षण प्रसारक संस्थेच्या लालबहादूर शास्त्री विद्यानिकेतन व उच्च माध्यमिक विद्यालयातील तसेच अध्यापक विद्यालयातील खालील माजी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक, कृषीसहाय्यक पदांवर निवड झाल्याबद्दल टकले प्रियंका दत्तात्रय,गरड विक्रांती राजेंद्र, दांगट अश्विनी राजेंद्र, दांगट वर्षा राजेंद्र,गवाड विरेंद्र अशोक,लोमटे प्रगती मनोहर, लोमटे अविनाश शिवाजी, जाधव जितेंद्र या माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने संस्थेतीचे संस्थापक व सचिव आदरणीय टिकले गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार, शाल,श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. एस.लोमटे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालक,खेड गावातील सामाजिक कार्यात सहभाग असलेले माजी विद्यार्थी युसूफ सय्यद व त्याचे सहकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.या सत्कार समारंभाचे औचित्य साधुन युसुफ सय्यद व लहू वारे यांच्या वर्ग मित्र मैत्रिणीं द्वारे ही सर्व यशवंतांचे साहित्य पुस्तके देऊन गौरव करण्यात आला,या कार्यक्रम प्रसंगी यशवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करतांना विद्यालयाचे व विद्यालयातील शिक्षक यांचे आभार मानुन विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले आदरणीय टिकले गुरूजी यांनीही मार्गदर्शन केले.


 
Top