धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा समुद्रवाणी व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बचत गट कर्ज मेळावा ग्रामपंचायत मेंढा येथे आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी मेंढा व समुद्रवाणी  गावातील 10 बचत गटातील महिलांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमा वेळी महिलांना गुंतवणूक, कर्ज परतफेड, विविध सामाजिक सुरक्षा योजना,तसेच बचती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच महिलांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी  जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री चिन्मय दास सर नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी चैतन्य गोखले सर , महाराष्ट्र ग्रामीण बँक धाराशिव शाखा व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी सर,उमेदच्या  तालुका अभियान व्यवस्थापक गायकवाड मॅडम व शेरखाने सर या सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या वेळी समुद्रवाणी शाखेअंतर्गत 10 बचत गटांना 15 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाबार्ड व महाराष्ट्र ग्रामीण बँक स्पोंसर्ड एटीएम व्हॅन इन्चार्ज श्री जगताप सरांनी पार पडले.


 
Top