धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळलेल्या समाजबांधवांना गुन्हेगारी पासून परावृत्त करुन मुख्य प्रवाहात आणणेसाठी “पहाट” उपक्रमाचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजन करण्यात आले. 

तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकार्णी म्हणाले की, आदिवासी पारधी समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचे काम जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेती असणाऱ्या समाजबांधवांना विविध फळबाग, पीके लागवडीसंबंधी व शासनाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर शेती नसणाऱ्या समाजबांधवांना राज्यशासन, केंद्रशासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजनांबाबत माहिती देण्यात आली. ज्यांच्याकडे आधारकार्ड, नाही अशा आदिवासी पारधी बांधवांना शासनामार्फत आधारकार्ड व इतर कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. तसेच पुढील हपत्यात आम्ही मोटर रोजगार मेळावाचे आयोजन करणार आहे. जेणेकरुन गुन्हेगारांना बाहेर काम मिळाले पाहीजे. यापुढेही आपण आदिवासी पारधी समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरीता पीडीवर शाळा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी विभाग लेणेकर, आदिवासी विभागाचे सरतापे, गुन्हेगारांचे मनपरिवर्तन करण्यासाठी वकील उबंरे, आधार कार्ड विभागाचे अनिकेत मुडके, ग्लोबल विकास ट्रस्टचे सुतार इत्यादी विभागाच्या तज्ञ मान्यवरांनी  मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, कृषी विभाग  लेणेकर, आदिवासी विभागाचे सरतापे, ॲड. उबंरे, आधार कार्ड विभागाचे अनिकेत मुडके, ग्लोबल विकास ट्रस्टचे सुतार अधिकारी कर्मचारी तसेच 57 गुन्हेगार उपस्थित होते.


 
Top