तेर (प्रतिनिधी)- प्रथम  इन्फोटेक फाउंडेशन यांच्या माझी ई शाळा कार्यक्रमाची परिणामकारकता तपासणी साठी राज्य प्रकल्प प्रमुख  निलेश ठाकूर ,डाकूमेंटरी विभाग प्रमुख रिमा अमरापूरकर, डिजिटल सहायक ज्ञानेश्वर.डिगे  यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेस   भेट देऊन पाहणी केली.                              

शाळेची व  प्रत्यक्ष इयत्ता चौथी व सातवी डिजिटल वर्गाची  पाहणी करुन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.मुख्याध्यापिका सुरेखा कदम  शिक्षक सुशिल क्षिरसागर, प्रतिभा जोगदंड  यांची मुलाखत घेतली.विद्यार्थीनी सदफ शेख व तिचे पालक  बख्तावर शेख व.कलिमा शेख यांची त्यांच्या घरी जाऊन डिजिटल अभ्यास, गरज, महत्त्व,फायदे, शिक्षणातील प्रगती अशा अनेक बाजूंनी माझी ई शाळा याबाबत संवाद करुन शिक्षक, विद्यार्थी शाळेच्या प्रगती बाबत डिजिटल साक्षरतेबाबत समाधान व्यक्त केले. शाळेची डाकूमेंटरी तयार केली. यावेळी शाळेतील रामहरी पसारे, पल्लवी पवार, ज्योती गाढवे उपस्थित होते. शाळेच्या वतीने सुशिल क्षिरसागर यांनी आभार मानले.


 
Top