धाराशिव (प्रतिनिधी)-शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगाराचे आधारस्तंभ मराठा आरक्षण चळवळीचे जनक स्वर्गीय कै. अण्णासाहेब पाटील यांचा 42 वा स्मृतिदिन तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे पुण्यस्मरण दिन निमित्त समितीने अभिवादन सभेचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमासाठी स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये समितीचे सर्व पदाधिकारी एकत्र जमवून अण्णासाहेब पाटील तसेच शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी समितीचे अध्यक्ष श्री गौरव बागल यांनी आपले मनोगतात असे सांगितले की महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेला मराठा समाज सर्वप्रथम अण्णासाहेब पाटलांनी एकत्र आणून मराठा महासंघाची स्थापना केली. तसेच मराठा आरक्षणाचा चळवळीचा उदय अण्णासाहेबांनीच घडवून आणला होता. मुंबईमध्ये पाच लाख मराठा बांधवांचा विराट मोर्चा विधान भवनावर घेऊन जाऊन आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा केला होता. अण्णासाहेब पाटील हे मराठ्यांचे आद्य क्रांतिसूर्य आहेत. त्यांच्या योगदानामुळेच मराठा समाजाच्या आरक्षण मागणी चळवळीला मोठा आधार मिळाला आहे. कै अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी केलेले अतुलनीय कार्य संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात परिचित आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे धनंजय साळुंखे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मनोज मोरे यांनी मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष गौरव बागल, उपाध्यक्ष आकाश कोकाटे, सचिव अमोल पवार, शहराध्यक्ष मंगेश निंबाळकर, उपाध्यक्ष आकाश भोसले, धनंजय साळुंखे, नितीन विर, दत्ता साळुंखे, सुनील मिसाळ, अविनाश रणखांब, दादा कदम, रुद्र कदम, योगेश आतकरे, प्रभात मुंडे, मनोज मोरे, भैरवनाथ रणखांब, अर्जुन बारुंगुळे, आबासाहेब रणखांब, प्रशांत वीर, संजय गायकवाड यांचे सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top