परंडा (प्रतिनिधी) - दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम 92 अ व ब नुसार कारवाई करून दिव्यांगांना न्याय दिल्याबद्दल दिव्यांग संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, बीट आमदार मुळे यांचा दिव्यांग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

परंडा तालुक्यातील कौडगांव येथील एका दिव्यांगावर  दि 22 मार्च रोजी  झालेल्या मारहाणी संदर्भात कलम 92 अ व ब लावून दिव्यांगांना न्याय देत संबंधित आरोपीस अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. दिव्यांगांना योग्य न्याय मिळाला व न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, एपीआय कविता मुसळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्याबद्दल दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, सतीश पवार, भाजपा सरचिटणीस महादेव बारसकर, पवन शिंदे, दादा माने, फुलचंद माने,  यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.


 
Top