उमरगा (प्रतिनिधी)-तुकोबांरायांचा गाथा हा पंचम वेद असुन चार वेदाचा सारथ समोर  ठेऊन गाथ्याची रचणा करण्यात आली आहे.  भगवंताचे नाम हे जगामध्ये श्रेष्ठ आहे भगवंताच्या अज्ञेशिवाय झाडाचे पाण सुद्धा हलु शकत नाही. नका जाऊ तया गावा / नामधारकाच्या नावा या प्रमाणे भगवंतांचे नामस्मरण केल्यास यम व काळ सुद्धा झुकतो व पळुन जातो असे मत दामोदरास मठाचे मठाधिपती महंत अवधूतपूरी महाराज यांनी व्यक्त केले. 

उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवानिमित्त किर्तण सेवा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी किर्तण  सेवे करीता “तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम“ या अभंगाचे निरुपण करतांना भाविक भक्तांना संबोधित होते. किर्तण सेवे नंतर गुलालाचीवृष्टी 12 वाजता करण्यात आली. तदनंतर बलभिम सटवाजी भालेराव यांनी लिखीत केलेले संतयोगी दामोदर महाराज चरित्र सेवेच्या पुस्तकाचे प्रकाशन महंत अवधूतपूरी महाराज यांच्या व भक्तांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पुस्तक प्रकाशक मोहनराव कांबळे भजनीमंळचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड, सरपंच सतिश जमादार, उपसरपंच बापूराव गायकवाड, माजी सरपंच राधाताई गायकवाड, पोलिस पाटील महेश जाधव, तंटामूक्ति समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, विनेकरी रमेश गायकवाड, श्रीराम कुलकर्णी, अंबादास पाटील, भागवत जाधव, विश्वंभर जाधव, सोनाजी जाधव, अशोक गायकवाड, उमेश जाधव, राम गायकवाड, भागवत जाधव, मन्सूर शेख, साधू हिराळे, बसवराज कांबळे, भगवान माने, बालाजी कांबळे, बालाजी समिंदर कांबळे, प्रशांत कांबळे, अनंद सुर्यवंशी, अदिसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


 
Top