तुळजापूर (प्रतिनिधी) - माजी राज्यमंञी माजीगृहमंञी शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुञ  महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष   बसवराज पाटील यांनी अखेर  मंगळवारी  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे  उपमुखमंञी देंवेद्र फडणवीस यांच्या उप- स्थितीत भाजपमध्ये प्रवेश  केला असुन आता  त्यांचे  तालुक्यातील समर्थक काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

उमरगा लगत तुळजापूर तालुका असुन या तालुक्यात लिंगायत समाज लक्षणीय आहे या समाजाचे  नेतृत्व या पुर्वी माजी आ कै सि ना आलुरे गुरुजी कडे होते नंतर  लिंगायत समाजाचे दुसऱ्या फळीचे नेते भाजप मध्ये दाखल झाले आहेत  आता उरले सुरले जाणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

लिंगायत समाजात आलुरे गुरुजींचा तोडीचे नेतृत्व तालुक्यात  नसल्याने व त्या तोडीचे नेतृत्व तयार न झाल्याने हा समाज बसवराज पाटील यांच्या कडे नेतृत्व रुपाने पहात असल्याचे दिसुन येते    या बरोबरच त्यांचे काही समर्थक काँग्रेस पक्षात मोठ्या पदावर आहेत त्यामुळे त्यांचे समर्थक काय भूमिका घेणार  काँग्रेस मध्ये च राहणार राहिले तर काँग्रेस चे काम प्रामाणिकपणे करणार का याची उत्सुकता आहे. माञ बसवराज पाटलांचा भाजप प्रवेशामुळे तालुक्यात भाजप ला आणखी बळकटी येवुन याचा लाभ लोकसभा विधानसभा निवडणुकीत होण्याची मोठी शक्यता आहे,बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवैशाचा  काय परिणाम होणार हे लोकसभा निवडणुकी नंतर कळणार आहे. सध्या माञ भाजप ला अछे दिन तालुक्यात येण्याचे संकेत दिसत आहे.

पुन्हा भाजप  जिल्हयाचे नेतृत्व उमरगा लोहारा कडे वळल्याचे दिसुन येत आहे.  बसवराज पाटील धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील मुरुमचे आहेत. ते 1999 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांना त्यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली होती. बसवराज पाटील हे 1999 ते 2004 या काळात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते. पण 2004 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते सर्वात आधी उमरगा विधानसभेतून जिंकून आले होते.

पण पुढे हा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे पक्षाने त्यांना 2009 च्या निवडणुकीत औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तसेच त्याच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना त्यांचा विजय झाला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर पक्षाने त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची संधी दिली. माजी मुख्यमंत्री अश-  ोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील यांनी देखील काँग्रेसला रामराम केल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. एका महिन्यातच काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण, मिलिंद देवरा हे काँग्रेसमधून बाहेर पडले. यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांची थेट राज्यसभेवर वर्णी लागली. तर चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. आता बसवराज पाटील यांनीही पक्षाला रामराम ठोकल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.


 
Top