तुळजापूर (प्रतिनिधी)-परिक्षा व सुगी कालावधी व दुष्काळ सदृश्य परिस्थिती  असुन ही तिर्थक्षेञी  श्रीतुळजाभवानी  दर्शनार्थ  भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

बारावी परीक्षा  अंतिम टप्प्यात  असताना  दहावी परिक्षा सुरु झाल्या त्यामुळे पालक मुलांचा परिक्षेत दंग तसेच रबी  पिके काढणी  हंगाम जोरात असल्याने ग्रामीण भागातील भाविक शेती कामात गुंतुन पडला आहे. यापुर्वी परिक्षा व सुगी काळात मंदीरात भाविकांची वर्दळ खुपच कमी असे पण सध्या तसे चिञ दिसुन येत नाही. उलट भाविकांनी दिवसभर मंदीर गजबजुन जात आहे. सध्या गर्दी दिवशी मंदीर पहाटे एक वाजता दर्शनार्थ खुले केले जात आहे. तरीही भाविकांची गर्दी होतच आहे.सध्या देविजींच्या सिंहासनावर शेतकऱ्यांनी दिलेल्या द्राक्ष आरास केला जात आहे. सध्या दिवसभर भाविकांनी बाजारपेठ बहरून जात आहे.


 
Top