धाराशिव (प्रतिनिधी)-चिखली (ता.धाराशिव) येथे ग्रामस्थांच्या हस्ते जवळपास पावणेदोन कोटीच्या कामाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच वृंदावणी जाधवर व उपसरपंच उत्रेश्वर जाधव यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार केैलास पाटील यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातुन चिखली गावात आजपर्यंतचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यातील अनेक कामे पुर्ण देखील झाली असुन काही कामे प्रगतिपथावर आहेत. खासदार निधीतुन शिवगुरु महाराज पालखी तथा कालाकिर्तन स्थानाच्या विकासासाठी दहा लाख रुपये निधी दिला आहे. त्याच ठिकाणी कार्यक्रम (ता.14) रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रस्ते,नाली तसेच पाणीपुरवठा योजनेंतर्गत अंतर्गत घरोघरी पाणी देण्याची कामे करण्यात येत आहेत.