धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय येथे कळंब तालुक्यातील खेर्डा येथील तरुणांनी गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्यांना प्रवेश देत पक्षात स्वागत केले.

यावेळी खेर्डा येथील गणेश खराडे, रमाकांत लिके, असलम शेख, चंद्रकांत खराडे, अक्षय कांबळे, लोकरे, विद्यासागर कांबळे, ज्ञानेश्वर खराडे, विठ्ठल कांबळे, भैरवनाथ राजमाने आदींनी  देशाचे नेते शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. यावेळी भास्कर शिंदे, भालचंद्र बिराजदार, नरदेव कदम, शिवाजी सावंत, सुरेश टेकाळे, ॲड. प्रवीण शिंदे, सागर चिंचकर, रमेश देशमुख, औदुंबर धोंगडे, भारत शिंदे, मुसद्दीक काझी, नाना पाटील, नाना जमदाडे, बाळासाहेब कणसे, डॉ. ताडेकर व कळंब तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी  दुधगावकर यांनी तरुण सहकायांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षांमध्ये स्वागत केले व आलेल्या तरुण सहकार्यांना सन्मानाची वागणूक पक्षामध्ये मिळेल व तरुणांनी ग्रामीण भागातल्या अडीअडचणी विषयी येणाया काळामध्ये लोकांमध्ये जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन केले.


 
Top