तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे गाझी हॉलीबॉल संघ, बबलू मोमीन युवा मंच, अमन स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित सिंह चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर येथील पोलीस हॉलीबॉल संघ प्रथम विजेता ठरला .                      

या स्पर्धेचे उद्घाटन 2 मार्चला डॉफ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत  जेजूरी येथील हॉलीबॉल संघ व्दितीय विज्‌ेता ठरला तर सोलापूर येथील आय .एस.हॉलिबॉल संघ तृतीय विजेता ठरला. विजेत्यां हॉलीबॉल संघास 4 मार्चला तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, जुनेद मोमीन, अप्पासाहेब चौगुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी अन्वर कोरबू, मज्जिद मणियार, अर्शाद मुलांनी,रिजवान मोमीन, ईर्शाद मुलानी, मुजीब शेख, राजू मुलानी, सद्दाम तांबोळी,गाझी मोमीन, तोफिक मणीयार, तोसिफ मोमीन, शहाबाज मुलानी, नौमान काझी, साहील मुलांनी उपस्थित होते.


 
Top