धाराशिव (प्रतिनिधी)-ज्यांनी कारखाने, नगर पालिका बुडवली. यांच्या भ्रष्ट्राचार संदर्भात एकही शब्द न बोलता देशाचे पंतप्रधान मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका टिपण्णी करायची हा कार्यक्रम म्हणजे महाविकास आघाडीचा कार्यक्रम असल्याची टिका भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

रविवार दि. 3 मार्च रोजी छत्रपत्री हायस्कूलच्या प्रांगणात ॲड. असिम सरोदे व ॲड. विश्वभंर चौधरी यांचे निर्भय बनो या कार्यक्रमांतर्गत प्रचंड जाहीर सभा झाली. या सभेत सरोदे व चौधरी यांनी मोदी सरकार व शिंदे फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टिका केली. या संदर्भात भाजपाने सोमवार दि. 4 मार्च रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. संताजी चालुक्य यांनी सरोदे व चौधरी यांनी न. प. धाराशिव व तेरणा साखर कारखाना बुडविण्याच्या भ्रष्ट्राचारासंदर्भात जाहीर भाषणात का बोलले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. सरोदे व चौधरी हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखे बिनबुडाचे आरोप करीत होते. माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी चौधरी व सरोदे हे स्वयघोषित समाजसेवक आहेत. गेल्या पाच वर्षात खासदारांनी काय विकास केला असे म्हणत शिवसेनेच्या खासदार, आमदारांवर टिका केली. तर ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा बँक, तेरणा कारखाना हे खासदाराच्या कुटुंबियाने बुडविला आहे. याबद्दल सरोदे व चौधरी का बोलले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. या पत्रकार परिषदेस भाजपाचे जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, प्रविण पाठक, बाळासाहेब क्षीरसागर, अभय इंगळे, इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते. 


 
Top