धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2023 च्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा मुख्य संयोजक डी. के. शेख यांनी केली. जाहीर केलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे. 

आत्मकथन- वग माझ्या आयुष्याचा- अतांबर शिरढोणकर , चरित्र -गुजरते हुए (विख्यात हिंदी, उर्दू कवी,लेखक,अनुवादक,समीक्षक,चित्रकार डॉ. सादिक यांचे चरित्र)-डॉ. उर्मीला चाकूरकर व  लोकमाता अहिल्याबाई होळकर- डॉ.रामकिशन दहिफळे, कादंबरी-उसवण-देविदास सौदागर, एक भाकर तीन चुली-देवा झिंझाड, अमीर खुसरो - मिलिंद जाधव. समीक्षा- जगदीश कदम यांची कविता: स्वरूप आणि आस्वाद- प्रा.गणेश मोताळे. ललित लेख-लहरी - कमल नलावडे, मुरडण - बालाजी इंगळे. संकीर्ण -एकूण शाहिरी वाड्मय 4 खंड - शाहीर शिवाजीराव पाटील, राहून गेलेली पत्रे- दगडू लोमटे, मराठवाडा नव्हे -भारत  मुक्तिसंग्राम - युवराज नळे. संपादन-संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज -डॉ. रमेश माने, सीमाप्रदेश: बोली आणि संस्कृती -डॉ. विनोद  काबंळे.बालसाहित्य-खुशालचेंडू. (कथासंग्रह) - आबासाहेब घावटे कविता-आम्ही युद्धखोर आहोत- प्रशांत  वंजारे, काळजाचा नितळ तळ- भीमराव धुळूबुळू, तुझ्या सहीची डावी बाजू- अमिता पेठे- पैठणकर. अनुवाद - यज्ञ आणि इतर कविता- पारमिता षडंगी- मूळ ओडिया कविता- मराठी अनुवाद- रचना. कथा - झुरळ आणि काहीबाही - प्रमोदकुमार अणेराव. नाटक- कुणब्याची लेक - सरिता उपासे. येत्या काही दिवसात कार्यक्रमाचे नियोजन करून पुरस्कार वितरण केले जाईल अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष डी. के.शेख, उपाध्यक्ष गिरीश जव्हेरी, सचिव एम.जे .खतीब यांनी दिली.


 
Top