तुळजापूर (प्रतिनिधी) -  तुळजापूर तालुक्यात 2021-22मध्ये सोयाबीन भाव हजारा पर्यत पोहचला होता. त्यानंतर सोयाबीन भाव न वाढल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी व व्यापारी वर्गास मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे  जावे लागले आहे. हंगामाच्या आरंभापासूनच दबावात असलेल्या सोयाबीनच्या दराने आता तर निश्चयांक गाठला असून हमीभावाच्याही खाली दर घसरला आहे.

सध्या सोयाबीन हमीभाव 4600रुपये असताना शुक्रवारी सोयाबीनला 4400 रुपये भाव मिळाला आहे. गेल्या तीन वर्षात यावर्षी सोयाबीनला मातीमोल दर मिळत असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. काही शेतकऱ्यांनी 7800रुपये भाव मिळाला असताना भाव वाढेल या आशेवर साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाला आहे. दिवाळीनंतर सोयाबीन बाजार तेजीत राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. परंतु

दिवाळीनंतर तर दरात घसरण होऊन क्विंटल मागे तब्बल 400 रुपये घटले आहेत. मागील वर्षी मार्च मध्ये सोयाबीनल 5400रुपये भाव मिळत होता यंदा दुष्काळ परिस्थिती उत्पादन कमी तरीही ऐक हजार रुपये भाव उतरला आहे.

गेल्या दोन वर्षाचा विचार केला तर सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. तालुक्यात सोयाबीनचा पेरा  चांगला. तुळजापूर  तालुकात सर्वाधिक पेरा हा सोयाबीन असुन मागील काही वर्षापासून तुळजापूर तालुका सोयाबीन म्हणून तालुक्याची ओळख निर्माण केली आहे. या चालू हंगामातही मालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरवाढीच्या अपेक्षित साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांपुढे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यंदा तर आवक व दर ही घटले आहे भाव वाढीच्या आशेने तीन वर्षापासून ठेवलेल्या सोयाबीन ला भाव मिळत नसल्याने शेतकरी ञस्त झाला असुन आता काय पेरावे व कुंटुंबाचा उदार निर्वाह करावा अशी त्याच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे.


 
Top