धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक सचिवपदी खलील पठाण यांची निवड पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.

खालील पठाण यांची निवड करताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य लाभेल अशी आशा बाळगून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सचिव संघटक पदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील कार्यालयात ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, मुंबई येथील निसार अहेमद, आराफात काझी, समीर खतीब, मच्छिंद्र क्षीरसागर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top