तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या तुळजापूर विकास आराखड्यासंदर्भात आज मंदिराजवळील 77 जागा मालकांची गुरुवारी, (दि. 21) दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर येथे बैठक आयोजित केली आहे. ती बैठक रद्द करण्यात आली.
गुरुवार दि. 21 मार्च रोजी दुपारी ठिक 12 वाजता मालमत्ता धारकांचे लेखी म्हणणे ऐकून घेण्यासाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर बैठक आयोजित केलेली होती. सदरील बैठक प्रशासकीय कारणास्तव, व वास्तुविशारद हेमंत पाटील पुणे हे गैर हजर असल्याने सदरील बैठक रद्द करण्यात येत आहे. याची सर्व मालमत्ता धारकांनी नोंद असे आवाहन उपविभागीय अधिकारी, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी केले आहे.