भूम (प्रतिनिधी)-  भूम शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा भूम ते वारदवाडी रोडचे काम बस स्थानक गोलाई ते शासकीय दूध योजने पर्यंत रस्त्याचे काम काँक्रिटीकरणाने केले जात आहे. हे काम गुणवत्तेचे केले जावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासण्याचा प्रयत्न केला. रस्त्याचे काम अगदीच दर्जेदार झाले पाहिजे यासाठी पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. हे काम नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार मंजूर झाले आहे.

भूम शहरातिल वारदवाडी रस्ता हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून मोठी वाहतूक आहे. सोलापूरला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. पालखी मार्ग देखील आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय रस्ते व वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील मोठे मोठे महामार्ग केले आहे. प्रत्येक गाव महामार्गाला जोडले आहे. त्याच योगदानातून या रस्त्याचे काम होत आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिध्दी प्रमुख शंकर खामकर, प्रदिप साठे , जयवंतनगरचे उपसरपंच बापू नागरगोजे, विधिज्ञ सेल तालुका अध्यक्ष ॲड संजय शाळू, ॲड. पी. छी. मोटे, सरचिटणीस लक्ष्मण भोरे, शिवाजी उगलमुगले,  सचिन साठे  यांनी पाहणी केले.


 
Top