धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील  मध्यवती भागात असणाऱ्या श्री चित्रमंदिर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी दवारा निर्मित व विश्व विद्यालयाचा पूर्ण इतिहास  दर्शविणाऱ्या द लाईट या चित्रपटाचा शुभारंभ आज (9 मार्च)शहारातील   पत्रकार व अन्य मान्यवराच्या शुभहस्ते  झाला.

चित्रपटगृहाचे मालक आदित्य गोरे पत्रकार संतोष हंबीरे, मयुर काकडे, वाघोलीच्या सरपंच सुलभा  खडके,प्रेमा सुधिर पाटील जी.बी.राजपूत,  मच्छीद्रनाथ कदम,शाम गंगावणे  सुधिर पवार,राजे माता  संचालिका ज्योती बहनजी,आश्दिनी पिंपळे बहन  मंच संचालक उपस्थित होते.

या वेळी मान्यवराचे स्वागत सत्कार करून दिप प्रज्वलन करण्यात आले, मान्यवराना आध्यात्मिक साहित्य भेट करण्यात आले. यावेळी चित्रपट गृहामधे सुमारे 500  प्रेक्षकानी याचा लाभ घेतला. मंच संचलन ब्र कु सुरेशभाई जगदाळे यानी केले.


 
Top