धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.          

यावेळी धनेश्वरी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.शिल्पा प्रतापसिंह पाटील, श्रीमती अस्मिता सचिन  ओंबासे (लेखिका,धाराशिव), श्रीमती वृषाली टेलोरे (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, धाराशिव), डॉ.शोभा टोले ( प्राध्यापिका, के.टी .पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव)  श्रीमती अर्चनाताई अंबुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.                                           कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. शिवानी डोके  यांनी केले. 

तसेच श्रीमती वृषाली टेलोरे यांनी स्त्री- पुरुष समानता व महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.श्रीमती टोले मॅडम यांनी स्त्रियांचे समाजासाठी असलेल्या योगदानाबद्दल आणि  भगवान श्री शंकराचे अर्ध नारीच्या नटवेश्वराचे रुप हेच सांगत आले की  दुष्ट शक्तीचा सामना करण्यासाठी तो आणि ती एकच असणे गरजेचे आहे अशी माहिती दिली. तसेच श्रीमती ओंबासे मॅडम यांनी महिलांचा प्रशासनामध्ये वाढत असलेला सहभाग याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अंबुरे यांनी  स्त्री शक्तीचा महिमा वर्णन करताना येणारा काळ हा स्त्रियांचा असून जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर व सर्वोच्च पदावर आहे असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. व शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या संचालिका डॉ.पाटील मॅडम यांनी स्त्रियांचा प्रत्येक क्षेत्रामधला वाढत चाललेला सहभाग आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री सक्षमीकरणाचा वाढत चाललेला प्रभाव स्पष्ट केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवानी येडे व मधू लक्ष्मी थोरात यांनी केले.आणि आभार प्रदर्शन प्रा.अबोली ठाकूर यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top