सोलापूर (प्रतिनिधी)-ट्रेन क्र. 11411/ 11412 परळी- मिरज- परळी एक्सप्रेस एक्सप्रेसला आणि ट्रेन क्र.  01413/ 01414 निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद डेमू प्रायोगिक तत्वावर मुरुड रेल्वे स्थानकावर देण्याचा  निर्णय  रेल्वे प्रशासनने घेतला आहे. ते  पुढील प्रमाणे आहे.

ट्रेन क्र. 11411/ 11412 परळी- मिरज- परळी एक्सप्रेस एक्सप्रेस. गाडी क्रमांक 11411  परळी- मिरज एक्सप्रेस अधिसूचित  दिनांक  11.03.2024 ला  मुरुड रेल्वे स्थानकावर  सकाळी 10.59 वा आगमन  आणि 11.00 वा. प्रस्थान होणार.  गाडी क्रमांक 11412 मिरज- परळी - अधिसूचित  दिनांक 12.03.2024 ला मुरुड रेल्वे स्थानकावर रात्री 02.24 वा आगमन आणि 02.25 वा.प्रस्थान होणार. 

ट्रेन क्र. 01413/01414  निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद डेमू ट्रेन. गाडी क्रमांक 01413 निजमबद- पंढरपूर डेमू  अधिसूचित  दिनांक  11.03.2024 ला  मुरुड रेल्वे स्थानकावर  रात्री 11. 34 वा आगमन  आणि 11.35 वा. प्रस्थान होणार. गाडी क्रमांक 01413  पंढरपूर - निजामाबाद डेमू  अधिसूचित  दिनांक  12.03.2024 ला  मुरुड रेल्वे स्थानकावर  सकाळी 09. 14 वा आगमन  आणि 09.15 वा. प्रस्थान होणार. आरक्षण: विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आधीच सुरू आहे. वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा  ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top