कळंब (प्रतिनिधी)-जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात  लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे व विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा या शाळेने डाँ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभाग घेतला होता. ही शाळा या अभियानात सहभागी झाल्यामुळे  केंद्र,तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरीय मुल्यांकन समितीने या  शाळेचे मुल्यांकन केल्यानंतर भाटशिरपुरा शाळेने लातूर शिक्षण विभागात प्रथम मिळवला आहे.

लातूर शिक्षण विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, गोविंदपूर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख तथा प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे व शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक सचिन तामाने, श्रीकांत तांबारे ,अमोल बाभळे,शहाजी बनसोडे, राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे,प्रमोदिनी होळे श्रीम.रंजना थोरात व चित्रकार पंडीत वाघमारे यांचा शाल , पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून सत्कार केला.

सरपंच श्रीम. सुनिता दिलिप वाघमारे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुर्यकांत खापे,शाळाव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम.प्रियंकाताई गायकवाड,उपाध्यक्षा श्रीम.कीर्तीताई झोंबाडे ,माजी अध्यक्ष रमेश रितपुरे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेची मुख्यमंत्री कु. अनुष्का झोंबाडे, उपमुख्यमंत्री विजयराजे वाघमारे, क्रीडामंत्री विनय शिंदे, शिक्षणमंत्री प्रगती गायकवाड,आरोग्यमंत्री आशिष सावंत, सांस्कृतिक मंत्री शिवक्रांती गायकवाड, उद्यागमंत्री पृथ्वीराज गायकवाड ,शिस्तमंत्री श्रेया कदम, पोषणआहार मंत्री पुरुषोत्तम खापे व स्वच्छता मंत्री गायत्री पांचाळ या  शालेय मंत्रीमंडळाने परिश्रम  घेतले स्वराज शिंदे यांनी अभंग गायला तर इयत्ता 6 वी च्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण तांबारे ,सुत्रसंचलन शाळेची विद्यार्थी कु.शिवक्रांती गायकवाड व कु.विनय शिंदे यांनी केले तर आभार कु. प्रगती गायकवाड हीने मानले.


 
Top