सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष-2023-24 (एप्रिल-2023 ते फेब्रुवारी-2024) मध्ये 80.20 दशलक्ष टनांचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मालवाहू लोडिंग नोंदवले आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीसाठी मागील वर्षीच्या तुलनेत 9.6% च्या वाढीसह आतापर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेचे आर्थिक वर्ष-2022-23 (एप्रिल-2022 ते फेब्रुवारी-2023) या कालावधीत 78.13 दशलक्ष टन लोडिंग केले होते.  

फेब्रुवारी-2024 मध्ये 7.98 दशलक्ष टन लोडिंग झाले, तर फेब्रुवारी-2023 मधील त्याच महिन्यात 7.11 दशलक्ष टन लोडिंग झाले होते. फेब्रुवारी मधील 12.3% च्या वाढीसह हे आतापर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आकडे आहेत. 

मध्य रेल्वेने सर्व कमोडिटीजमधील कामगिरी सुधारली आहे ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करण्यात सक्षम झाले आहे ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16.8% वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेचे तुलनात्मक लोडिंग आकडे खालीलप्रमाणे आहेत:

फेब्रुवारी-2024 मध्ये कोळशाचे 1036 रेक कोडींग झाले, जे फेब्रुवारी-2023 मध्ये 903 रेक होते.  फेब्रुवारी-2024 मध्ये कंटेनरचे 742 रेक, जे फेब्रुवारी-2023 मध्ये 661 रेक होते.  फेब्रुवारी-2024 मध्ये सिमेंटचे 245 रेक, तर फेब्रुवारी-2023 मध्ये 192 रेक होते.  फेब्रुवारी-2023 मधील 144 स्टील रेकच्या तुलनेत फेब्रुवारी-2024 मध्ये स्टीलचे 167 रेक. फेब्रुवारी-2024 मध्ये ऑटोमोबाईल्सचे 107 रेक, जे फेब्रुवारी-2023 मध्ये 76 रेक होते. 

 फेब्रुवारी-2023 मधील 01 रेकच्या तुलनेत फेब्रुवारी-2024 मध्ये लोहखनिजाचे 44 रेक.   फेब्रुवारी-2023 मधील 17 रेकच्या तुलनेत फेब्रुवारी-2024 मध्ये अन्नधान्यांचे 21 रेक. एनटीकेएम, जे एक किमीवर वाहून नेले जाणारे एक टन पेलोड आहे, फेब्रुवारी-2023 च्या तुलनेत फेब्रुवारी-2024 मध्ये यात 12.9% ने वाढ झाली आहे.


 
Top