धाराशिव (प्रतिनिधी)-हात मदतीचा सामाजिक बहुद्देशीय संस्था  खानापूर ता.जि.धाराशिव या संस्थेचा प्रथम शाखा उद्घाटन सोहळा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. यावेळी  उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह मगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बलभीम जमदाडे व संस्थेचे कायदेशीर सल्लागार सुदाम पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश झेंडे संस्थेचे सदस्य प्रेमकुमार मगर, दत्ता जाधव, महेश जाधव,अश्विनी मगर यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी युवा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रा. डॉ.मारुती लोंढे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षीरसागर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, सुरज भाऊ लोंढे, कुमार भाऊ कांबळे,तसेच संस्थेचे सदस्य शाखाप्रमुख व सर्व ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य आदी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी अनेक प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन येथोचित सत्कार केला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज मगर व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह मगर यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.


 
Top