परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील अनाळा येथील जि.प.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रेवननाथ शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे यांची सर्वानुमते दि.16 रोजी निवड करण्यात आली. 13 सदस्य संख्या असलेल्या शालेय व्यवस्थापन समिती मधून दोघांची अध्यक्ष - उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दि.16 रोजी जि.प. शाळेत शालेय व्यवस्थापन समिती बैठक मुख्याध्यापक गौतम रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या समिती मध्ये जावेद शेख ,उषा क्षिरसागर, स्वाती चव्हाण, शिवाजी जाधव, अनिता काटकर, शुभागी शिंदे, कविता सरवदे, कमलेश गोडसे, लक्ष्मण मुकटे, बाजीराव रणदिवे, कानिफनाथ फराटे, आदिचा सामावेश आहे. निवडी नंतर अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचा सत्कार सरपंच जोतीराम क्षिरसागर ,माजी उपसरपंच दादासाहेब फराटे , भाजपा सोशल मिडीया तालुका अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर, भाजपा युवा नेते भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.प. सदस्य चांगदेव चव्हाण, अजित शिंदे, विनोद कदम, अशोक शिदे, ओंकार शिदे, चतुर्भुज शिंदे, बालाजी शिदे, अंबादास क्षिरसागर, बाजीराव पवणे, रविद्र रिटे यांच्या सह शिक्षक ए. एस. तांदळे, पी. पी. साबळे एम. बी. केमदारणे, शिक्षिका के एस. येळवे, एस. एस. पाटील, एस.टी. पालके, एम. ए. राऊत यांच्यासह विदयार्थी उपस्थित होते.


 
Top