परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक 13 मार्च 2024 रोजी स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व अर्थशास्त्र विभाग तसेच आयबीएफएसए यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आला.या मुलाखती घेण्यासाठी कोल्हापूर येथील आयबीएफएसए चे सहाय्यक मॅनेजर प्रणव कापसे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर उपप्रचार्य डॉ. महेश कुमार माने स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन डॉ. अरुण खर्डे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलावडे डॉ संभाजी गाते डॉ सचिन साबळे डॉ अमर गोरे पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अरुण खर्डे यांनी केले या प्रास्ताविकामध्ये डॉ अरुण खर्डे म्हणाले की महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी प्राप्त हव्यात यासाठी स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन विभाग तसेच अर्थशास्त्र विभाग सतत कार्यरत असतो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या व्यवसायाचे ज्ञान संपादन करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आजच्या शिबिरातून एचडीएफसी ॲक्सिस बँक आयसीआयसीआय बँक इत्यादी व्यापारी बँकांमध्ये विविध पदे आहेत त्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत त्यामध्ये आपण सहभागी होऊन चांगली मुलाखत देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही अपेक्षा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मुलाखतीचे स्वरूप बँक क्षेत्रातील विविध उपलब्ध पदाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्रुटमेंट मॅनेजर प्रणव कापसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातून एकूण 28 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ सुनील जाधव म्हणाले की महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी प्राप्त हव्या यासाठी मार्गदर्शन विभागाच्या वतीने वेगवेगळे विभागाच्या माध्यमातून मुलाखती घेऊन विद्यार्थ्यानी स्वतःच्या पायावर कसे उभा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विद्याधर नलवडे यांनी केले तर डॉ सचिन चव्हाण यांनी आभार मानले.