उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील सरपंचपदी सौ.शिवकन्या महेश शिंदे तर उपसरपंचपदी श्री .अमोल अरुण अंबुलगे यांची दिनांक 15 मार्च 2024 रोजी बिनविरोध निवड झाल्याने सामाजिक कार्यकर्ते सातलिंग सामलिंग स्वामी यांनी मुळज येथे जावून त्यांचा आईतुळजाभवानी देवीची प्रतीमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात केला. 

याप्रसंगी दीपक चव्हाण ( शिवसेना शाखाप्रमुख मुळज ), दयानंद पाटील, अमोल गंगथडे, अनिल दंडगुले, शिवाजी कोकळे, संगमेश्वर स्वामी, श्रीकर बिराजदार, किशोर माडजे, गंगाधर गुंजले, गोविंद पाटील, जळकोट येथील पत्रकार संजय रेणुके, भिमाशंकर यादगौडा यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top