धाराशिव (प्रतिनिधी)-आयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या राम लल्लाचा दर्शन घेण्यासाठी धाराशिव लोकसभेतील 1344 रामभक्त उद्या दिनांक 05 मार्च 2024 रोजी सायंकाळी चार वाजता धाराशिव येथून आस्था रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार आहेत. सुमारे पाचशे साठ वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आता दर्शनासाठी खुले झाले आहे प्रभू रामचंद्र हे सर्वसामान्यच्या अस्तित्वाच आणि त्याच सोबत अस्मितेच प्रतीक असलेलं स्थळ म्हणजे आयोध्या आणि या आयोध्यामध्ये भव्य दिव्य राम मंदिर नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उपस्थितीत ज्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला होता त्या राम लल्लांचे दर्शन घेण्याचा योग धाराशिव लोकसभेतील 1344 राम भक्तांना होत आहे हा अत्यंत आनंदाचा क्षण धाराशिव लोकसभेसाठी आहे या सर्व राम भक्तांना दिनांक 05 मार्च रोजी सायंकाळी 04 वाजता विशेष रेल्वेने जाण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्या सर्व राम भक्ताचे स्वागत करण्यासाठी आ. राणा जगजितसिंह पाटील आ. अभिमन्यू पवार, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. सुजितसिंग ठाकूर त्यासोबत माजी मंत्री बसवराज पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रामभक्तांनी या सर्व प्रवासी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने धाराशिवच्या रेल्वे स्टेशनवर दिनांक 05 मार्च रोजी दुपारी 04 वाजता उपस्थित राहावे असं आव्हान लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी केलेले आहे.


 
Top