धाराशिव (प्रतिनिधी)-काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांची वाढलेली संख्या पाहून पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, हे आज दिसून येत आहे. कोणताही नेता पक्ष सोडून गेला तरी कार्यकर्ता पक्ष सोडून जात नाही, हे प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याने लक्षात ठेवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्या मजबूत कराव्यात. पक्षाच्या बूथ प्रतिनिधींनी पक्षाची विचारधारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढवावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांनी केले.

धाराशिव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक रविवारी पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ॲड. पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जणांनी पक्षांतर केल्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या संघटनावर परिणाम होईल अशी चर्चा होत होती. परंतु या बैठकीला उमरगा आणि लोहारा तालुक्यातील उपस्थित कार्यकर्त्यांच्या संख्येमुळे काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. कोणी पक्ष सोडू गेले म्हणून कार्यकर्त्यांनी संभ्रमात पडू नये. राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण आणि आपण स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत आहोत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच बूथ कमिटी सदस्यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापूरकर, उपाध्यक्ष खलील सय्यद, अभिजीत चव्हाण, विजयकुमार सोनवणे, महेश देशमुख, अषिलेश मोरे,यांच्यासह तालूका पदाधिकाऱ्यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सुत्रसंचालन पक्षाचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी केले, आभार बाजार समितीचे संचालक उमेश राजे यांनी मानले.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सेवा दलाचे विलास शाळू, प्रदेश सचिव अभिजीत चव्हाण, शंकरराव करंजकर, युवक प्रदेश सचिव महेश देशमुख तालुकाध्यक्ष पांडूरंग कुंभार, ॲड. हनमंत वाघमोडे, रोहित पडवळ, राजेश शिंदे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, रमेश परदेशी, रवि ओझा, नवाज काझी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेबुब पटेल, विजयकुमार सोनवणे, नाना भोसले, प्रदेश सचिव शीला उंबरे, जिल्हा सरचिटणीस आश्लेष मोरे, सिध्दार्थ बनसोडे, अशोक बनसोडे, विनोद वीर, अमर माने, अशोक भातलवंडे, भूषण देशमुख, अशोक शेळके, वसंत मडके, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष कफील सय्यद, धनंजय राऊत, अल्पसंख्यांक अध्यक्ष अय्युब पठाण, प्रेमानंद सपकाळ, अहमद चाऊस, शशिकांत निरफळ, अनिलकुमार लबडे, विलास करंजकर, अब्दुल लतीफ, विश्वंभर मैंदाड, विकास तांबे, स्नेहप्रभा पाटील, संजय गजधने, सौरभ गायकवाड, रविंद्र डोंगरे, संजय पवार, कृष्णा तवले, सलमान शेख, बालाजी माने, धवलसिंह लावंड, दिलीप क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर जगताप, महादेव आरबळे, सचिन गायकवाड, शहजान शिखलकर, अवधुत क्षीरसागर, अमर तागडे, अमित रेड्डी, अजय खरसडे, मेहराज शेख, रामलिंग नंदगावकर, सिराज मोगल, संजय देशमुख, पंडित सुरवसे, अमोल चव्हाण, आबासाहेब रोडे, हनमंत पाटील, शामराव भोसले, भारत काटे, सुनिल गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, विकास कोराळे, संतोष चौधरी, ॲड.इरफान जमादार, चंद्रकात जाधव, शुभम कांबळे, सुरेश मोकाशे, महेश जाधव, संतोष चौधरी यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.


 
Top