धाराशिव (प्रतिनिधी)- फिर्यादी भैरु विश्वनाथ मिसाळ, वय 65 वर्षे, रा. जहागिरदारवाडी, ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.18.12.2023 रोजी 22.00 ते दि. 19.12.2023 रोजी 04.00 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 80 हजार असा एकुण 1 लाख 39 हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी भैरु मिसाळ यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे  गुरनं 349/2023 कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा तपासादरम्यान  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथील गुरनं 349/2023 कलम 454, 380 भ.दं.वि.सं. गुन्हृयातील निष्पन्न आरोपी संतोष उर्फ चैन्या ढाकरशा भोसले, वय 37 वर्षे, रा. रस्तापूर ता. बार्शी  जि. सोलापूर याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी धाराशिव ग्रामीण पो. ठाणे गुरनं 1) 349/2023 कलम 454, 380, 2) गुरनं 342/2023 कलम 457, 380, 3) 267/2023 457, 380, तसेच धाराशिव शहर पो. ठाणे गुरनं 330/2023 कलम 457, 380 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 14.10 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 हजार रूपये रोख रक्कम असा एकुण 94 हजार रूपये किंमतीचा माल हस्तगत केला.  आरोपीस चोरीच्या मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, जावेद काझी, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, नितीन जाधवर, बबन जाधवर,रवि आरसेवाड, रत्नदिप डोंगरे,  यांच्या पथकाने केली आहे.


 
Top