धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील गडदेवधरी येथे वंचित बहुजन युवक आघाडी व महिला आघाडी या दोन्ही शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

 धाराशिव तालुक्यातील गडदेवधरी युवा शाखेच्या अध्यक्षपदी किशोर बर्वे यांची तर महिला आघाडीच्या शाखा अध्यक्षपदी आम्रपाली सुरवसे यांची निवड करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, युनूस पटेल, विजय बनसोडे, जिल्हा युवा आघाडीचे प्रवक्ते गोविंद भंडारे, उपाध्यक्ष आशिष लोंढे, संघटक बाबा वाघमारे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष सागर चंदनशिवे, उपाध्यक्ष अशोक कांबळे, महासचिव बाळासाहेब भोरे, तालुका संघटक मनीष कांबळे, विक्की शिंदे, संतोष साबळे आदींसह महिला, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top