तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात  तापमानात मार्च महिन्यात मोठी वाढ झाली असून, उन्हाच्या तीव्रतेने घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. कडक उन्हाळा

असल्याने शारीरिक समस्या वाढत असून डोकेदुखी, गरगरणे, हीट स्ट्रोक, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे (डिहायड्रेशन), घामोळे व इतर त्वचेच्या तक्रारी आदी प्रकार होत आहेत. सध्या वाढत्या तापमानाचा फटका लहान मुले, महिला, कमी वजन असणारे मंडळी ,वयोवृध्द मंडळीना बसत आहे. उष्णते पासुन होणाऱ्या आजारांच्या रुग्णाची संख्या दवाखान्यांमध्ये वाढत आहे.

शरीरातील  वाढती उष्णता कमी करण्यासाठी पुढील प्रमाणे विविध उपाययोजना कराव्यात असे आवाहन डाँक्टर मंडळी  करीत आहेत. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची भरपूर गरज असल्यामुळे शरीर थंड राहण्यासाठी विविध पेये, फळे खाणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेची आहे. अत्यावश्यक काम असेल तरच दुपारी बाहेर पडा. पडाताना उन्हापासुन संरक्षण करणारे टोपी, गमजा, गाँगल वापरा. तसेच आहारात प्रामुख्याने हंगामी फळे, भाज्या वापरा शरीरात उष्णता वाढविणारे अति प्रमाणात नॉनव्हेज, अति प्रमाणात तिखट, तेलकट पदार्थ, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ

टाळावेत. हे पदार्थ उन्हाळ्यामध्ये पचायला जड जातात. याचबरोबर कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस टाळावेत. उन्हाळ्यात आधीच तापमान  वाढला असताना तिखट पदार्थ खाणे टाळल्यास प्रकृती उत्तम राहू शकते. जेवणत दही, ताक, कच्चे सलाड जसे की काकडीचा दररोज समावेश करावा, लिंबू सरबत,

शहाळ्याचे पाणी, ऊसाचा रस आदी थंड पदार्थांचे सेवन करा. वाढत्या  उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास अनेकांना सुरु झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे उपचार केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. जेणेकरुन उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार होवु शकेल.


 
Top